पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी तुफान गर्दी, मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीची खास इच्छा केली पूर्ण..
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज देशात तिसऱ्या टप्प्याच ११ राज्यातील लोकसभेच्या एकूण ९३ जागांसाठी मतदान होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये मतदान करू आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्यासोबत होते.
“आज तिसऱ्या टप्प्याच मतदान आहे. आपल्या देशात ‘दाना’च खूप महत्त्व आहे. देशवासियांनी जास्तीत जास्त मतदान करावं” असं आवाहन या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलय. “अजून चार टप्प्याच मतदान बाकी आहे. गुजरातमध्ये याच मतदान केंद्रावर मी नेहमी मतदान करतो. भाजपाचे उमेदवार म्हणून अमित शाह इथून निवडणूक लढवतायत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या या मतदान केंद्रावर येणार म्हणून त्यांना पाहण्यासाठी सकाळपासूनच इथे मोठी गर्दी होती. पंतप्रधान मोदींशी हात मिळवण्यासाठी एकच चढाओढ सुरु होती.या वेळी मोठी झुंबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर आले. त्यावेळी त्यांनी एका व्यक्तीची खास इच्छा पूर्ण केली. या व्यक्तीने पंतप्रधान मोदींच सुंदर चित्र काढून आणलं होतं. पंतप्रधान मोदींनी ते चित्र पहाव अशी त्याची इच्छा होती. मोदींनी ते चित्र पाहिलं. त्यांना आवडलं. त्यांनी त्या पोट्रेटवर आपली स्वाक्षरी केली.