१९ वर्षीय युवकाचा ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। कांदिवलीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका सहा वर्षीय मुलीवर १९ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चंदन साहू असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी हा एका हॉटेलमंध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. मंगळवारी आरोपी पीडित मुलगी ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी चंदनने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीच्या घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी आरोपीला एका हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा आरोपी झारखंडचा रहिवासी असून तो ज्या हॉटेलमध्ये काम करत असे आणि त्याच हॉटेलमध्ये राहत होता.