भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आता बागायत २० गुंठे आणि जिरायत २ एकर, खरेदीवर निर्बंध!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसंस्था)। जमिनीच्या विक्री किंवा वाटणीवरून अनेक वाद होत असतात. यामुळे आता राज्यात जमीन खरेदीच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे आता पूर्वीसारखी खरेदी आपल्याला करता येणार नाही. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार जिरायती क्षेत्र दोन एकर तर बागायती २० गुंठे क्षेत्र असल्यास त्यातून तुकडे करून जमीन विकताना यापुढे परवानगी लागणार आहे.

यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर अभ्यास देखील सुरू आहे. जमिनीचे तुकडीकरण, वादविवाद व गुंतागुंत कमी व्हावी, यामुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
खरेदी-विक्रीसाठी आता सक्षम प्राधिकरणाची परवानगी असल्याशिवाय व्यवहार करता येणार नाही. बागायती जमीन २० गुंठ्यापेक्षा कमी असेल अथवा जिरायती जमीन दोन एकरापेक्षा कमी असल्यास त्याची खरेदी-विक्री करतानाही परवानगी बंधनकारकच असणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या आदेशाची अंमलबजावणी १२ जुलैपासून काटेकोरपणे सुरू झाली आहे. मात्र यावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. यामुळे व्यवहारात विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या उत्पन्नावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामध्ये तुकडे बंदी, तुकडे जोड कायद्याअंतर्गत नोंदणी विभागाचे महानिरीक्षकांनी काढलेल्या नव्या परिपत्रकानुसारच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. परवानगीशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. अशी माहिती समोर आली आहे. काही गुंठ्यांची खरेदी करताना त्या सर्व्हे क्रमांकाचा ले-आउट करून त्या गुंठे खरेदीला जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
तसेच एखाद्या गटात दोन एकर जमीन असेल, तर त्यातील काही पाच-दहा गुंठे खरेदी करता येणार नाही. यामुळे जमिनीचे तुकडे पडणार नाहीत. यामुळे आता या नवीन नियमामुळे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!