अधिवेशनावर कोरोनाचं सावट; अधिवेशनांच्या आधीच ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी): राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. १ ते १० मार्चपर्यंत असे दहा दिवस अधिवेशन होणार आहे. पण अधिवेशनावर कोरोनाचं सावट कायम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींचा सुद्धा सुमावेश आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक होते आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी साधारणपणे ३ हजारपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. त्यात मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार तीन हजार पैकी ३२ लोकं पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यात विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या आमदारांनी विधान भवनामध्ये टेस्ट केल्या होत्या त्या बहुतेक निगेटिव्ह आल्याची माहिती विधानभवन करून देण्यात आली आहे. पण बऱ्याच आमदारांनी आणि मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्यापी आली नाही, अशी माहिती विधान भवनाकडून देण्यात आली आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशांना तात्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्यास सांगितले असून लक्षणं आढळत असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची सूचना देखील देण्यात आल्याची माहिती विधानभवनाकडून देण्यात आली आहे.