भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात काल दिवसभरात ८ हजार कोरोना रुग्ण,मंत्री,आमदार कोरोना बाधित, कठोर निर्बंधांचे संकेत

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातीस मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळत आहे.ता.31 डिसेंबर च्या दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे गेल्याने चिंता वाढली आहे.

काल दिवसभरात राज्यातील विविध भागात ८ हजार ६७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ करोनाबाधितांचा या मध्ये मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका असून आज १ हजार ७६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ सुमारे ९.६८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ता.30 डिसेंबर ला देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुमारे 3 हजार 900 रुग्ण आढळले होते. तर, पुण्यात काल ४१२ नवीन करोनाबाधित आढळले असून, १ हजार ७९९ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

दिवसेंदिवस राज्यात ओमीक्रॉन रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. काल राज्यात चार ओमीक्रॉन रूग्ण आढळले आहेत. यामध्ये वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमीक्रॉन बाधित आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमीक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचा तपासणी अहवाल आला असून यापैकी १५७ रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यशासनाने खबरदारी म्हणून काही निर्बंध घातले आहेत. अशीच रूग्णसंख्या वाढल्यास कठोर कारवाईचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले आहे. तसेच, कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत 15 ते 18 वयोगटाचे लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले .

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.तसेच पुणे मुंबईत कोरोना वाढला की इतरत्र पसरतो,मुंबईत पुणे मुबंईत कोरोनाचे आकडे वाढत आहेत, या शहरात आकडे वाढले की इतर ठिकाणी त्याचा प्रसार होतो, असं अजित पवार म्हणाले. इथले आकडे पाहून कटू निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेत अजित पवार यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!