18 जानेवारीला पृथ्वीच्या दिशेनं येत आहे विनाशकारी संकट,नासाने दिले धोकादायक संकेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। लघुग्रहामुळे विनाशकारी स्थिती निर्माण होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. हे लघुग्रह अवकाशात पृथ्वीभोवती फिरत असतात.
आतापर्यंत केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता आणि त्यामुळे पृथ्वीवरून डायनॉसॉर नष्ट झाले होते, असं देखील सांगितलं जातं. तेव्हापासून अनेक लघुग्रह अनेकदा पृथ्वीच्या जवळून गेले, परंतु सुदैवानं अद्याप कोणताही लघुग्रह पृथ्वीवर आदळलेला नाही. आता 18 जानेवारी 22 ला आतापर्यंतचा सर्वांत मोठा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं नामकरण 7482 (1994 PC1) असं करण्यात आलं आहे.
अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (National Aeronautics and Space Administration) अर्थात ‘नासा’चे (NASA) शास्त्रज्ञ गेल्या काही काळापासून या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. त्यानुसार हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास विनाशकारी स्थिती निर्माण होऊ शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे. भविष्यात लघुग्रह पृथ्वीवर आदळू नयेत, यासाठी नासानं एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. आजपासून चार दिवसांनी म्हणजेच 18 जानेवारीला वर्षातील पहिला लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.
त्याची रुंदी सुमारे 3551 फूट आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 1.2 दशलक्ष मैलांवरून जाईल. हा आकडा जरी तुम्हाला मोठा वाटत असला तरी यामुळे पृथ्वीला किती धोका आहे, याचा विचार केला तर ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह पृथ्वीसाठी निश्चितच धोकादायक आहे. ‘नासा सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज’ने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह धोकादायक लघुग्रह असू शकतो.
याचाच अर्थ या लघुग्रहामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. नासाचे शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. 18 जानेवारी अर्थात मंगळवारी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने लघुग्रह खेचला गेला तर तो पृथ्वीवर आदळू शकतो. आणि जर एवढा मोठा लघुग्रह आदळला तर पृथ्वीवर विनाशकारी स्थिती निर्माण होऊ शकते. नासा भविष्यात लघुग्रहांना पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्याकरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ‘नासा’नं डार्ट मिशन लॉंच केलं आहे. गेल्या आठवड्यात आणखी एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला होता. पण आता जो लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह आहे आणि तो पृथ्वीवर आदळला तर विनाशकारी स्थिती निर्माण होईल, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा