भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ” हे ” ट्विट केलं

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्याने राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रात्री उशिरा पर्यंत जामीनावर सुनावणी होऊन जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ‘सत्य मेव जयते’ असं ट्विट केलं आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना काही अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा राणे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!