भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात २९ जानेवारी नंतर थंडीची लाट, थंडीचा जोर अधिक वाढणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता २९ जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. २ फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती, मुंबईतही पारा घसरणार-हवामान विभाग
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते असे हवामानविभागाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. २९ जानेवारीनंतर मात्र, थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!