भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अनिल देशमुखांना ईडीचा दिलासा नाहीच,”या” तरखे पर्यंत कोठडी वाढवली

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष ईडी कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांची १२ नोव्हेंबर पर्यंतची ईडीची कोठडी संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तसेच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे त्यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!