भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

चिंता वाढली! 5 वर्षांखालील मुलांवर अ‍ॅटॅक करतोय Omicron Variant ? वैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, वृत्तसंस्था। Coronavirus Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 रुग्ण समोर येत होते.

आता दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावेळी 5 वर्षांखालील मुलांमध्येही झपाट्याने संसर्ग वाढत आहे. सर्व मुलांना ओमिक्रॉनची लागण झाली नसली तरी, मुलांमध्ये संसर्ग वाढल्याने चिंताही वाढली आहे.

Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 रुग्ण समोर येत होते. मात्र, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी लहान मुलांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD)च्या Dr Waasila Jassat यांनी म्हटले आहे की, ‘कुठल्याही व्हारसमध्ये मुलांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. या आधीच्या साथींच्या रोगांमध्येही असेच दिसून आले आहे. मात्र, तिसर्‍या लाटेत, 5 वर्षांखालील मुले आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच, आता चौथ्या लाटेत सर्व वयोगटांत, विशेषत: 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे.’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!