भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी,शाहरुख खानला मोठा धक्का,आता जामीन मिळणार ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ,वृत्तसंस्था। क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरिल निकाल दिला.

आर्यनला आधी एक दिवस नंतर तीन दिवस कोठडी
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर आर्यनला पहिल्यांदा एक दिवस आणि नंतर तीन दिवस असे एकूण चार दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. आजही एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच यावेळी आर्यन खानला जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले असून उद्या या अर्जावर  सकाली  11 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीने आपली बाजू मांडण्याचेदेखील आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आर्यन खाचनी आजची रात्र कोठडीतच जाणार असून उद्या सकळी अकरा वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार का ? हे उद्याच समजू शकेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!