भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातल्या ” या ” आमदाराची 255 कोटींची मालमत्ता ईडी कडून जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रीय समाज पक्षाचे (आरएसपी) महाराष्ट्रातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. डिसेंबर 2020 मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात एजन्सीने ही मालमत्ता जप्त केली होती. एजन्सीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 255 कोटी रुपये आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,गुट्टे यांच्यावर ईडीने ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी विविध गरीब शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची फसवणूक केली होती. घेतलेले कर्ज एका योजनेंतर्गत होते. ज्यामध्ये बँकांनी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी उपकरणे, बियाणे, खते, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते.

तसेच गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले आणि तब्बल ६३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे २०१२-१३ आणि २०१६-१७ दरम्यान होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत.

दरम्यान न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये गंगाखेड साखर कारखाना आणि २४७ कोटी किमंतीची यंत्रसामग्री, इतर तीन संलग्न कंपन्यांची सुमारे ५ कोटी रुपयांची जमीन आणि डिसेंबर २०२० मध्ये यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या काही मालमत्तांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!