भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

सावधान! राज्यात तिसऱ्या लाटेत ८० लाख कोरोनाबाधितांची नोंद तर ८० हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता!-डॉ. प्रदीप व्यास

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येदरम्यान नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने ८० लाख कोरोनाबाधितांची नोंद आणि ८० हजार रुग्णांच्या मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. कारण राज्यात तिसऱ्या लाट स्पष्टपणे सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शुक्रवारी रात्री उशीरा सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी अशी शक्यता वर्तवली की, जर तिसऱ्या लाटेदरम्यान ८० लाख कोरोनाची प्रकरणे आढळली आणि जरी एक टक्के मृत्यूचा अंदाज लावला तरी आपण ८० हजार मृत्यू नोंद होऊ शकते.

पुढे डॉ. व्यास यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट सौम्य आणि कमी घातक असल्याचे मानून चालू नका. ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी तितकाच तो घातक आहे. त्यामुळे लसीकरण करा आणि लोकांचा जीव वाचवा. हे पत्र जिल्ह्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बाधितांची संख्या देखील वाढते आहे. सध्या सापडणाऱ्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत असल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असल्याचे आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!