भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबाचा 4 महिलांवर अत्याचार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, वृत्तसंस्था। पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका भोंदू बाबाने चार महिलांवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भोंदू बाबाने आर्थिक अडचणीत असणाऱ्या महिलांना पैशांची भूल पाडून पीडित महिलांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार देखील केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत फसवणूक झालेल्या ४ महिला पुढे आल्या आहेत. यातील दोन पीडित महिला मूकबधीर आहेत. या चारही पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर विरार येथील अर्नाळा सागरी पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे.

विरार येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेला आर्थिक चणचण होती. जुलै महिन्यात तिच्या परिचयाच्या असणाऱ्या दिनेश देवरुखकर या व्यक्तीने महिलेला मॅथ्यू पंडियन या बाबाविषयी सांगितले. हा बाबा मंत्र आणि पूजा करून आर्थिक अडचण दूर करतो, असे सांगून दिनेश देवरुखकर याने पीडित महिलेला त्याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याला बळी पडून पीडित महिला विरार येथे बाबा राहत असलेल्या एका घरात गेली. पूजेसाठी पंडियन याने तिच्याकडून १० हजार रुपये घेतले.

पंडियनने तिला सांगितले की पूजेनंतर कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडेल. त्यानंतर पूजेच्या बहाण्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार त्याने अन्य ३ पीडित महिलांसोबत केला. त्यांच्याकडूनही पैसे घेऊन त्यांच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी कुठे वाच्यता केली तर जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन, अशी धमकीही दिली होती. जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यात पंडियन बाबाने अनेक वेळा या महिलांवर अत्याचार केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले. दरम्यान फिर्यादी महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी भोंदूबाबासह त्याचा साथीदारा दिनेश देवरुखकर याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अशाच प्रकारे इतरही अनेक महिलांवर अत्याचार केला असावा. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अर्नाळा सागरी दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!