भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी:चंद्रकांत पाटलांचा लेटरबॉम्बने खडबड,अजित पवार,अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा,अमित शहांना पत्र

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. भाजपची नुकतीच कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करावी, असा ठराव संमत केला होता. त्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

अँटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय होता ठराव?
गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी करण्यात यावी, असा ठराव भाजपच्या कार्यकारिणीत संमत करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!