आताची मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू ; राज्य सरकारची नवी नियमावली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
अशी आहे नवीन नियमावली
– सार्वजनिक वाहतूकीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवास करण्यास मुभा
– सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश
–सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
– प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक
– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण आवश्यक किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर रिपोर्ट बंधनकारक
– सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश
– खासगी वाहनात मास्क न घातल्यास प्रवाशाला आणि वाहन मालकास प्रत्येकी ५०० रुपये दंड
– दुकानात ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉल मालकाला ५० हजार दंड
– राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड