भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यनाशिकमहाराष्ट्र

ब्रेकिंग – नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण आढळले महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोनाच्या (COVID-19) लाट ओसरली असल्यामुळे 22 जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शुन्यावर आली होती. पण, आता नाशिक मध्ये डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केला आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे.  सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.

दरम्यान, जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला जुलै महिन्यात यश आले होते. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘राज्यात कुठे ही  डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही’ असं जाहीर सुद्धा केलं होतं. पण, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!