भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग ;ओबीसी आरक्षण विधेयकावर अखेर राज्यपालांची
स्वाक्षरी,आरक्षणाचा मार्ग मोकळा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने जे विधेयक पाठवलं होतं त्यावर आज अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.

त्यामुळे राज्यात आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून तीनवेळा विधेयक पाठविण्यात आला होता. पण त्या विधेयकावर राज्यपालांकडून स्वाक्षरी झालेली नव्हती. राज्यपालांकडे हे विधेयक गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं.

या दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकवेळा या विधेयकाला मंजूर करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांकडून संपूर्ण बाजू राज्यपालांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विशेष म्हणजे राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे राज्यपालांच्या भेटीसाठी आज राजभवनावर गेले.

तिथे त्यांना राज्यपालांनी स्वाक्षरी केलेलं पत्र मिळल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. या भेटीदरम्यान राज्यपाल आणि दोन्ही मंत्र्यांमध्ये ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी प्रशासकीय आणि सरकारी कामकाज कुठपर्यंत आल्याची माहिती दिली.

“राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत एक अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाची मुदत आता संपणार आहे. आम्ही इंपेरिकल डेटासाठी आयोग नेमला आहे. सरकारने अध्यादेश काढला. त्या अध्यादेशात राज्यपालांची स्वाक्षरी होती. त्या अध्यादेशावर विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक मंजूर करण्यात आला आणि त्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं. या कायद्याला भाजपसहित सर्वांनी मंजूर केला. आम्ही सुप्रीम कोर्टात त्या कायद्याबाबत माहिती दिली.

आम्ही सुप्रीम कोर्टात सवलत देण्याची मागणी केली. निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. पण सुप्रीम कोर्टाने त्यावर काहीच भाष्य केलं नाही. आम्ही आमच्याकडे जमा झालेला डेटा जमा केला होता. त्यांनी आयोगाला डेटा देण्याचा आणि त्यांच्याकडून माहिती येऊ द्या, अशी माहिती दिली. आयोगाच्या याबाबत बैठका सुरु आहेत”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!