भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

सीबीआय अधिकाऱ्याला लाच म्हणून ‘आयफोन’ घेणं पडलं महागात, गोपनीय अहवाल केला लीक …

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसंस्था)। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार प्रकरणाचा गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका उप निरिक्षकाला काल अटक केरण्यात आली आहे. या अधिकाऱ्याला लाच म्हणून १ लाख रुपयांचा आयफोन-१२ देण्यात आला असल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआय अधिकारी  अभिषेक तिवारीला अटक करण्यात आली असुन, अनिल देशमुख देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासाचा अहवालाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. तर अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देण्याचा दावा करणारा सीबीआयचा प्राथमिक अहवाल कसा काय फुटला, याचे बिंग आता फुटले आहे. सीबीआयच्या एका उपनिरीक्षकाचे हे कृत्य पुढे आले असून त्याने कशासाठी हा अहवाल फोडला याचेही कारण सीबीआयने शोधून काढले आहे.

देशमुख यांच्या वकिलाने या उपनिरीक्षकाला १ लाख रुपयांचा आयफोन-१२ लाच म्हणून दिल्याचे उघड झाले आहे. त्यातूनच त्याने देशमुख यांचा सुरवातीचा चौकशी अहवाल फोडला. या अहवालानुसार देशमुख यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा अहवाल मान्य झाला नाही आणि सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गोपनीय आणि संवेदनशील माहिती फुटल्याने सीबीआयसाठी हा धक्का होता. त्यानंतर सीबीआयने हा अहवाल कसा फुटला याचा शोध सुरू केला.

अभिषेक तिवारी या अधिकाऱ्याला अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा याने लाच दिली होती. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तिवारी हा अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी पुणे शहरात आले होते, त्यावेळी तपासाच्या संबंधीत तपशील देण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी अभिषेक तिवारींना आयफोन-१२ प्रो दिला होता, असे सीबीआयने आपल्या एफआयआऱमध्ये दाखल केले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तामधून ही माहिती समोर आली आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक तिवारी यांच्याकडून तो आयफोन जप्त करण्यात आला असुन, तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिवारी यांनी अनिल देशमुखांच्या वकीलाकडून अनेकवेळा लाच घेतली होती असा सीबीआयचा आरोप आहे. तसेच सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून प्रकरणाचे तपशील अभिषेक तिवारी यांच्याकडे देण्यात आले होते, मात्र त्यांनी हे तपशीलांचा गैरवापर करण्याचा गुन्हा केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!