चाहूल तिसऱ्या लाटेची ; राज्यात नवीन 85 ओमायक्रॉनबाधित रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। राज्यात आज नवीन 85 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहचली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 252 रुग्णांपैकी 99 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. आज मुंबईत ओमायक्रॉनच्या 53 रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 85 रुग्णापैकी 47 जणांचा रिपोर्ट एनआयव्ही आणि 38 जणांचा रिपोर्ट आयआयएसईआर या संस्थेने दिला आहे. एनआयव्हीने दिलेल्या रिपोर्ट्समधील 47 रुग्णापैकी 43 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर चार रुग्ण संपर्कातील आहेत. यामध्ये मुंबईतील 34 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन-तीन रुग्णांची नोंद आहे. नवी मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी दोन – दोन रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
आयआयएसईआरने दिलेल्या रिपोर्ट्समधील 38 रुग्णापैकी 19 रुग्ण मुंबईतील आहेत. तर कल्याण डोंबिवलीमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. तर वसई विरार आणि पुणे शहरातील प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे ग्रामीण, भिवंडी, पनवेल आणि ठाण्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.