भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात ” या ” भागात पुढील दोन दिवसात मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीनं सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण केलं आहे. ऐन थंडीतही अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत असते.अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचही नुकसान झालं आहे.

सध्या थंडीत कोसळणाऱ्या सरींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. पुढील दोन दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे.

21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे.

दरम्यान, शनिवारी पुण्यासह मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि रायगड या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!