जळगाव सह राज्यात पुढील काही दिवसात “या ” जिल्ह्यात पावसाची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। ऐन कडाक्याच्या थंडीत राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. राज्यात येत्या 27 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं वर्तविण्यात आला.
उद्या रविवारपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात पुढील काही दिवसात काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना इशारा हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
29 डिसेंबरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.