राज्यात पुन्हा पुढील चार दिवस मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, “या” जिल्ह्यांना इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसंस्था। राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आज दिनांक 12 शुक्रवार आणि दिनांक 13,14,15 शनिवार, रविवार, सोमवार या चार दिवशी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.12 ते 15 नोव्हेंबर रोजी दरम्यान पाच दिवस राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे सहीत मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.