भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

राज्यात १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू होणार– शिक्षणमंत्री

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसंस्था)। महाविद्यालय सुरू करण्याबाबत एक मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. गेल्या काही दिवसांमध्ये कुलगुरुंसोबत बैठक झाली. आजच मुख्यमंत्री महोदयांनी महाविद्यालयं सुरू करायला मान्यता दिली आहे. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू होतील.

युजीसीनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठांनी पाळायला हवीत असा जीआर आम्ही जारी केला आहे. त्यासाठी क्लासरूममध्ये बसण्याच्या क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना रोटेशनने बोलवावं. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडसंदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेऊनच महाविद्यालये सुरू करता येतील. यावेळी फक्त महाविद्यालयेच सुरू होतील. वसतीगृहे सुरू होणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेता येतील, त्या आधारे विद्यापीठाने निर्णय घ्यावा’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आज शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असली, तरी कोविडच्या काळात ती अनिवार्य करू नये, अशी मागणी झाली होती. ती आम्ही मान्य करून त्याचा जीआरमध्ये समावेश केला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट केल्यानंतरच वसतिगृह सुरू करण्यात यावीत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारखे कोविडसंदर्भातले नियम यूजीसीने घालून दिले आहेत. ते देखील पाळूनच महाविद्यालये सुरू करावीत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम करत असल्यामुळे त्यांच्या आदेशांनुसारच जर कोविड परिस्थिती गंभीर झाली, तर त्यानुसार कॉलेजबाबत निर्णय घ्यावा, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!