भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

१ नोव्हेंबरपासून कॉलेज सुरू होणार, उन्हाळी सुट्यांमध्ये कपात !

मुंबई (वृत्तसंस्था)। राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून कॉलेजांचे प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने घेतला आहे. त्याचवेळी १८ नोव्हेंबरपासून राज्यातील विद्यापीठांना नवे शैक्षणिक वर्ष सुरू करता येणार आहे. विलंबाने सुरू होणार्‍या या शैक्षणिक वर्षातील निर्धारित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात कॉलेज कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीने प्रथम वर्षाचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठांना प्रथम वर्ष पदवीचे सर्व प्रवेश ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यास १८ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे विलंबाने कॉलेज सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सुटट्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी सुट्ट्या कमी करण्याची शिफारसही समितीकडून करण्यात आली आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा संपल्या की दरवर्षी साधारण २० ते २५ दिवसांची सुट्टी मिळते तर वर्षाअखेरीस जवळपास महिन्याभराची सुट्टी मिळते. मात्र आता या सुट्ट्यांमध्ये कपात होणार आहे. आठवड्यांचे सहा तास काम करा, लॉकडाऊनमुळे प्रवेश रद्द किंवा स्थलांतरित करावे लागल्यास पूर्ण शुल्क परत करा, अशा विविध सूचना या अहवालात दिल्या आहेत.

असे असेल शैक्षणिक वर्ष-

  • शैक्षणिक वर्षाची सुरूवात १ किंवा १८ नोव्हेंबरपासून
  • प्रवेश प्रक्रिया रखडल्यास १८ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ
  • पहिल्या सत्र परीक्षेपूर्वी १ ते ७ मार्च २०२१ सुट्टी
  • ८ ते २६ मार्च २०२१ दरम्यान पहिली सत्र परीक्षा
  • २७ मार्च ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान पहिल्या सत्राअखेरची सुट्टी
  • ५ एप्रिल २०२१ पासून दुसरे सत्र
  • १ ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान सुट्टी
  • ९ ते २१ ऑगस्ट २०२१ दरम्यान दुसर्‍या सत्राची परीक्षा
  • २२ ते २९ ऑगस्ट २०२१ वार्षिक किंवा दुसर्‍या सत्राअखेरची सुट्टी
  • ३० ऑगस्ट २०२१ पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!