महिनाभर तरी महाविद्यालये सुरु होणार नाहीत-उच्च,तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये पुढील महिनाभर सुरु होणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. महाविद्यालये सुरु करण्यासाठी पुढील महिनाभरासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितलेय. राज्यातील महाविद्यालये सुरु करणे म्हणजे एक मोठा समूह एकत्र येणार त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास त्यांच्या पालकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यासाठी पुढील महिनाभरासाठी कोणताही व्यवस्था करण्यात आलेली नाही असे असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्राचा मोठा तोटा झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा महाविद्यालये सुरु होतील अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या नवीन डोल्टा प्लस विषाणूची एंट्री झाली आणि त्यामुळे राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी अनेकांचे लसीकरण होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर महविद्यालये बंद राहणार असे त्यांनी म्हटले आहे.