भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्याला मोठा दिलासा!
रिकव्हरी रेट 91.74 % ,
रुग्णसंख्या 20 दिवसांत निम्म्यावर

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई( वृत्तसंस्था)। राज्यात लॉकडाऊन लावत कठोर निर्बंध लावण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कारण, राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला तर ब्रेक लागला असून दैनंदिन रुग्णसंख्येत घसरण तर होत आहे. त्यासोबतच राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही निम्म्याने घसरण झाली आहे. राज्यात गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे.

कोरोना रुग्ण संख्येत 20 दिवसात मोठी घसरण। राज्यात 1 मे 2021 रोजी 63,282 नवीन रुग्णांचे निदान झाले होते आणि त्यावेळी सक्रिय रुग्ण संख्या ही 6,63,758 इतकी होती. तर आता 20 दिवसांनंतर म्हणजेच आज राज्यात 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सक्रिय रुग्ण संख्या ही 3,67,121 इतकी झाली आहे. इतकेच नाही तर रिकव्हरी रेटही वाढत आहे. 1 मे रोजी राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 84.24 टक्के इतका होता तर आज राज्यातील रिकव्हरी रेट हा 91.74 टक्के इतका झाला आहे.
आज राज्यात 44,493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 50,70,801 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91,74 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!