आता १५ मीनिटात कोरोना रिपोर्ट, चाचणी १०० रुपयात, स्टार्टअपकडून नवं किट विकसित
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अशा स्थितीमध्ये कोरोना चाचण्या वाढवणं महत्वाचं मानलं जात आहे. सद्यस्थितीत आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट या दोन पद्धतीद्वारे कोरोना चाचणी केली जातेय. आता यामध्ये आणखी एका किफायतशीर कोरोना चाचणी किटची भर पडणार आहे. मुंबईतील पतंजली फार्मा संस्थेनं भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डीएसटीच्या मदतीनं हे किफायतशीर किट तयार केलं आहे. या किटद्वारे चाचणी करण्यासाठी येणारा खर्च केवळ १०० रुपये असून १५ मिनिटामध्ये याचा अहवाल प्राप्त होणार आहे,मुंबईमधील पतंजली फार्मा कंपनीने हे किट बनवले आहे. यासाठी त्यांना आयआयटी बॉम्बेची देखील मदत झाली आहे. किटद्वारे चाचणी करण्यासाठी येणारा खर्च केवळ १०० रुपये असून १५ मिनिटामध्ये याचा अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड १९ हेल्थ क्रायसिस जुलै २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी किट तयार करण्यासाठी स्टार्टअपला पाठिंबा दिला आहे.
पुढील महिन्यापासून टेस्टिंगला सुरुवात
पतंजली फार्मा या स्टार्टअपनं पुढील म्हणजेच जून महिन्यापासून रॅपिड अँटिजेन टेस्ट त्यांनी विकसित केलेल्या किटद्वारे करण्यात येतील, असं सांगितलं.रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे १० ते १५ मिनिटात कोरोना झाला आहे की नाही हे समजेल. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी डॉक्टर, पॅथोलॉजी लॅब, डायग्नोस्टिक लॅब उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी या किटचा वापर महत्वपूर्ण ठरेल, असंही विनय सैनी यांनी सांगतिलं.
८ते ९ महिन्यात किट विकसित
पतंजलि फार्माचे प्रमुख डॉ. विनय सैनी यांनी एसआईएनई, आईआईटी मुंबई यांच्या सहकार्यानं ८-९ महिन्यामंध्ये संशोधन आणि प्रयोगशाळांमध्ये चाचणी करुन किट तयार केल्याचं सांगतिलं. पतंजली फार्मानं सध्या या किटच्या लायसन्ससाठी अर्ज केला आहे. याशिवाय विविध कोविड सेंटरमध्येही याच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. विनय सैनी यांनी पतंजली फार्मा स्टार्टअपनं विकसित केलेल्या किटची चाचणी मुंबईतील विविध कोविड सेंटर केल्याची माहिती दिली.
.