कोरोनाची तिसरी लाट.. दिवाळीनंतर आली तरी…आरोग्य मंत्री टोपे काय म्हणतात वाचा..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे. असं असलं तरी अद्याप कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी असणार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नसल्याचं टास्क फोर्सने देखील सांगितलं आहे.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट अमेरिका, युरोपमध्ये आली, पण तिचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही.कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केले असून यामुळे कोरोनावर प्रभावी पणे नियंत्रण ठेवता येणार आहे.
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.