भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

डेल्टा प्लसचा संसर्ग ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा झाला हे सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देखील डेल्टा प्लसची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आता याची कबुली राज्याचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील योग्य खबर्दारी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

‘राज्यात डेल्टा व्हेरिएंटची होणारी वाढ हा फारसा चिंतेचा विषय जरी नसला तरी निरीक्षणाचा विषय आहे. दुसऱ्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर डेल्टा व्हेरिएंटला सामोरे गेलो आहोत. त्यामुळे काही प्रमाणात सामुदायिक प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये आहे. मात्र, डेल्टा प्लस हे त्याचं अपत्य समोर आलेला आहे त्याच्या गंभीर परिणामांकडे विशेषत्वाने कडे लक्ष देण्याची गरज आहे,’ असं ते म्हणाले. ‘डेल्टा प्लस रोखण्यासाठी विविध उपाय शासन राबवत आहे. दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस ही डेल्टा व्हेरिएंट येण्याआधी तयार झालेली आहे. जशी विषाणू मध्ये उत्क्रांती होते तशी लशी मध्ये सुद्धा फरक घडत जातात. त्यामुळे दोन डोस घेतले त्यांना डेल्टाचा संसर्ग होणार नाही अशातला भाग नाही किंवा असं कोणी समजू नये,’ असं डॉ. संजय ओक यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!