गिरीश महाजन यांना मोक्यात अडकवण्याचा स्टिंग, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर !
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिलावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आमदार गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्रं रचल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला आहे. हे षडयंत्र कसं रचलं जात होतं, त्याचे व्हिडीओ असलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
“गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी राज्य सरकारने षड्यंत्र करत आहेत. ठीक ठिकाणचा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे. मी पाच वर्ष गृह मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले महाराष्ट्राच्या पोलिसांनी मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. देशामध्ये कायदा नेमाने काम करणारे पोलीस दल हे महाराष्ट्राचे पोलीस दलाचे अशी ख्याती महाराष्ट्र पोलिसांचे मात्र अलीकडच्या काळात या पोलिस त्रास गैरवापर सरकारी पक्षाच्या माध्यमातून वाढला आहे.सरकार जर षड्यंत्र करायला लागला तर लोकशाहीला अर्थ उरत नाही असे फडणवीस यांनी म्हटलंय.
पोलीस आणि सरकारी वकील या सर्व प्रकरणात सहभागी असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे फडणवीस यांनी सांगितले. तसे न झाल्यास आम्ही कोर्टात जाऊ असेही ते यावेळी म्हणाले. सरकारवर विरोधकांना संपविण्याचे आणि कुठे प्रकरणामध्ये अडकवण्याचा आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत या माहितीच्या आधारे पंचवीस-तीस वेबसाईट होऊ शकतील असे ते म्हणाले पेन ड्राइव मधील जर काही भाग आपण सादर केला तर सभागृहाची प्रत जाईल असे गंभीर स्वरूपाचे विधान हे फडणवीस यांनी केले राज्यात काय चालल आहे. सरकार कसं कट शिजवत आहेत या संदर्भातील सर्व व्हिडिओस या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी अध्यक्षांना पेन ड्राईव्ह दिला. यात गिरीश महाजन यांना अडवण्यासाठी कशाप्रकारे षडयंत्र रचले गेले आहेत त्यासंदर्भात शंभर तासाहून अधिकचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचे पुरावे फडणवीस यांनी सरकारला दिले.
ही सर्व कथा हे सरकारी वकील आपल्या तोंडाने सांगतील. प्रत्येक घटनेचा छोटा व्हिडीओही तयार केला. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या नेत्यांबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारं आहे ते सांगू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.