पाकिस्तानातील धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं ! कोकणात पाऊस तर मुंबई, पुणे व महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। पाकिस्तान मधून निघालेले धुळीमय वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने कोकणात पाऊस तर मुंबई, पुणे व महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता देखील कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानातील धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं!
मुंबई – पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद ‘सफर’ने केली असून यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा यावेळी सल्ला देण्यात आला आहे. धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाहीय. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळाला आहे तर पावसाची काही ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी असल्याचे पाहायला मिळत आहे.