भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

ED चा दिवाळीतच धमाका;माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, प्रतिनिधी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. ही अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती.मात्र कठोर कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळाले नाही. ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.

देशमुख यांच्याबद्दलचा घटनाक्रम
मार्च २०२१ – परमबीर सिंह यांचे १०० कोटी वसुलीबाबतचे पत्र

५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

१४ एप्रिल रोजी अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर ९ तास झाली होती चौकशी

५ जून रोजी हजर राहण्याचे पहिले समन्स

२५ जून रोजी देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील घरावर छापे

२६ जून रोजी देशमुखा़ंना दुसरे समन्स

५ जुलै रोजी हजर राहणयाबाबत तिसरे समन्स

१६ जुलै रोजी देशमुखांची ४ कोटीची संपती जप्त केली (जप्तीमध्ये वरळीतील घर व उरणच्या धुतुम गावातील जमीनीचा समावेश)

१८ जुलै रोजी अनिल देशमुखांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर ईडीचे छापे

३०जुलै अनिल देशमुखने ईडी विरोधात सुप्रिम कोर्टत घेतली धाव

१६ आँगस्ट अनिल देशमुखाची याचिता सुप्रिमकोर्टाने फेटाळली

१८ आँगस्ट रोजी अनिल देशमुख यांना चौथं समन्स

आँगस्ट महिन्यातच ५वं समन्स बदावण्यात आलं

२ सप्टेंबर रोजी सीबीआयचा अनिल देशमुखांचा अहवाल झाला लिक

चौकशीला हजर रहात नसल्यामुळे ५ सप्टेंबर – ईडीची लूक ऑऊट नोटीस

३० आँक्टोंबर मुंबई उच्च न्यायालयाने ईडी विरोधात अनिल देशमुखाची याचिका फेटळली.

१ नोव्हेंबर अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीला ११ :३० वा वकिल इंद्रपाल सिंह सोबत हजर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!