भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जळगाव सह राज्यात १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका ,सप्टेंबरमध्ये मतदान

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यावर असलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतल्याने राज्यात आता जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये मतदान अपेक्षित आहे. निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा बँकेत मुंबै बँकसह नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर बँकेचा समावेश आहे. या बँकांवर सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळाची मुदत ६ मे २०२० मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल सव्वा वर्षांनंतर जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या ‘ महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ची अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या कोरोनासाथीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या संदर्भात आदेश दिले होते अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहकार विभागाने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यँत स्थगिती दिली होती. मात्र, विभागाने सोमवारी आदेश जारी करून निवडणुकीवरील स्थगिती उठवली.

निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थानी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घेऊन बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती,त्या टप्प्या पासून पुढे तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी,असे आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल. साधारणतः सप्टेंबरपर्यँत जिल्हा बँकांसाठी मतदान होऊ शकते,अशी माहिती सहकार विभागाकडून दिली.

निवडणूक होऊ घातलेल्या बँका
मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर, आणि बुलढाणा
न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक झालेल्या बँका
ठाणे, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद आणि लातूर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!