” ई-पीक पाहणी ” नोंदणीला मुदतवाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था। ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करायची मुदत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोंबर पर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे.
‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्व:ता करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे.
मात्र, राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यास अडसर निर्माण झाला होता. राज्यातील परस्थिती लक्षात घेता ‘ई-पिक पाहणीला 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.