Breaking: कोव्हिड सेंटरमध्ये अग्नितांडव, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू,शॉटसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था)। मुंबईपासून जवळच असलेल्या वेस्टर्न रेल्वे लाईन वर असणाऱ्या विरार मध्ये कोविड सेंटरला आग लागल्याची भयंकर घटना समोर येते आहे. या आगीमध्ये 13 रुग्णांनी प्राण गमावल्याची महिती मिळतेय.शॉटसर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे
मुंबईतील भांडूपमध्ये असणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये आग, नागपूरमध्ये कोव्हिड सेंटरल आग, भंडारा याठिकाणी रुग्णालयामध्ये लागलेली आग नाशिक मध्ये वायू गळती इ. या घटना ताज्याच असताना विरारमधून आगीची भयंकर घटना समोर येते आहे. या आगीमध्ये 13 रुग्णांनी प्राण गमावल्याने वृत्त आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे.सुरुवातीला याठिकाणी एकूण 17 रुग्ण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान लेटेस्ट अपडेट नुसार याठिकाणी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आले. शिवाय रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या. कोव्हिड रुग्णालयात ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी 90 कोव्हिड रुग्ण उपचार घेत होते.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अतिदक्षता विभागात अचानक रात्री 3 च्या सुमारास लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता विभागातील 13 रुग्ण यामध्ये दगावले आहेत. अग्निशमन विभागाने आग विझवली आहे.ही आग शॉटसर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे