भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

राज्यात इंधन दरवाढीचा भडका,
जीवनावश्यक वस्तू महागण्याची शक्यता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या कच्चा तेलाचे दर वाढल्याने आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल 29 तर डिझेल 37 पैशाने महागले असून, औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. त्यामुळे एकूणच राज्यभरात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबईत शुक्रवारी पेट्रोल 109.54 तर डिझेल 99.92 रुपये प्रति लिटर दराची नोंद करण्यात आली आहे. यातुलनेत राज्यभरात विविध जिल्ह्यात इंधनाच्या दराचा उच्चांक बघायला मिळाले आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेल चे दर शंभरीच्या मार्गावर आहे. तर राज्यभरात पेट्रोलच्या दरानेही सर्वसामान्यांचे खिशांना कात्री लावली असून, 110 ते 111 रुपये प्रति लिटर दराची नोंद झाली आहे.

इंधनाच्या दरासह सीएनजी, पीएनजीसह खाद्य तेल आणि सर्वच जीवनावश्यक वास्तूंचेही दरवाढ होत आहे. त्यामुळे इंधनाची दरवाढ होत असल्याने त्याचा परिणाम सर्वसमान्यांवर होणार आहे. शेतमालासह, उत्पादित वस्तूंचे दर दुप्पट वाढतच आहे. सध्या 7 टक्याने महागाई वाढली असून, संघटित कामगारांना तर याच फटका आहेच त्याशिवाय 97 टक्के असंघटित वर्गाला सुद्धा महागाईचा फटका बसतो आहे. शिवाय या महागाईमुळे असंघटित कामगारांचा पगार आल्या पावली संपत आहे. घरातील दैनंदिन गरजा आणि घरभाडे, आरोग्य, शिक्षणासाठीही असंघटित कामगार करू शकत नाहीये. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती सध्या सर्वसामन्यांची झाली आहे. त्यामुळे महागाईचे दुष्टचक्र महागाईला अधिक गरीब बनवत तर बाजारातील महागाईची विषमता वाढवत असल्याचे अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!