५० हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेचा ‘चेक’ देणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते, बँकेचे ‘हे ‘ नवीन नियम…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। ५० हजार रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेचा ‘चेक’ देण्यासाठी आता तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. बँकेचे ‘हे ‘ नवीन नियम… जाणून घेऊया…….
जर तुमच्याकडे बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग ची सुविधा नसेल तर ५० हजार रुपयांपेक्षा जास्तच्या रकमेचा धनादेश जारी करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते….कारण आता बँकांनी ‘ पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS)’ लागू करण्यास सुरू केले आहे. आणि बहुतांश बँका १ सप्टेंबरपासून हा नियम (RBI Rules) लागू करतील. यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने धनादेश ट्रांजक्शन सिस्टम साठी ऑगस्ट २०२० मध्ये ‘पॉझिटिव्ह पे सिस्टमची ‘ घोषणा केली होती. नव्या नियमानुसार बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी त्यांच्या इच्छेनुसार ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम असलेल्या धनादेश करिता हा नियम लागू करू शकतात.
रिझर्व बँकेच्या नव्या नियमा नुसार धनादेश जारी करण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे,अन्यथा धनादेश स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक रद्द होईल.
दरम्यान अॅक्सिस बँक व इतर काही बँकांनी ५० हजारपेक्षा जास्तीच्या चेकसाठी PPS अनिवार्य केले आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना बँकेला नेट/मोबाइल बँकिंग किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्याव्या लागतील. भारतीय स्टेट बँक (एसबीआय), कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ ५ हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या चेकसाठी लागू केले आहे.