भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी,ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मंडे टू मंडे। वृत्तसंकलन।

मुंबई , वृत्तसंस्था। राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मद्यावरील विशेष शुल्काबाबत राज्यातील ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने कमी केला आहे. हे दर १८ नोव्हेंबरपासून ३०० टक्क्यांवरुन १५० टक्के करण्यात आला होता. त्यामुळे आता दारुच्या निर्मिती शुल्काचा विचार करुन विदेशी दारुचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत.

काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष: शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील परदेशातून आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. दर कमी झाल्यामुळे आता तस्करीला आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील, असा दावा केला जात आहे.

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ५७६० तर नवीन दर ३७५० रुपये
जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०६० तर नवीन दर १९५० रुपये
जे अॅण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०६० तर नवीन दर २१०० रुपये
जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की जुना दर ३८०० तर नवीन दर २५०० रुपये
ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०७५ तर नवीन दर २१०० रुपये
शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये
जॉर्डन्स लंडन ड्राय जीन जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!