भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

15 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभा यंदाही रद्द, मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ऐच्छिक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात 15 ऑगस्टला गावोगाव होणाऱ्या ग्रामसभा यंदा होणार का, असा सवाल प्रत्येक नागरिकाला पडला होता. कारण, मागील वर्षा 15 ऑगस्टची ग्रामसभा रद्द करण्यात आली होती. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ऐच्छिक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!