भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

मृत्यूच्या विरहात आई झोपते चितेच्या राखेवर, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई (वृत्तसंस्था)। मागील गेल्या दोन महिन्यां पासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं वाढत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत असंख्य लोकांचे हकनाक जीव गेले . दरम्यानच्या काळात अनेकजणांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. तर अनेकांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरवलं आहे. तर काहींनी आपल्या पोटच्या लेकरांना गमावलं आहे. कोरोना विषाणूच्या संकटकाळात अनेकजण मृत्यूमुखी पडत असताना, एक आई मात्र आपल्या मुलाच्या मृत्यूच्या विरहानं व्याकुळ झाली आहे.

गुजरातमधील जुनीरोह गावातील रहिवासी असणाऱ्या मंगूबेन चौहान यांच्या मुलाचं 4 महिन्यांपूर्वी एका दुर्दैवी अपघातात निधन झालं होतं. मृत्यू होऊन चार महिने झाल्यानंतरही या मातेला दुखातून सावरता येत नाही. जेव्हा जेव्हा आपल्या मुलाची आठवण येते. तेव्हा तेव्हा या मुलाला अग्नि दिलेल्या राखेवर जाऊन झोपतात. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत त्या अनेकदा या ठिकाणी जाऊन झोपल्या आहेत. आता त्यांचं दुःख गावकऱ्यांनाही बघवत नाही. अनेकजण त्यांच्या मनाची समजूत घालायला पुढे सरसावतात पण याचा काहीही उपयोग होतं नाही.मंगूबेन जेव्हा जेव्हा घरातून गायब होतात. तेव्हा तिचे कुटुंबीय तिला शोधण्यासाठी याच अग्नी दिल्याच्या ठिकाणी येतात. आणि त्यांना परत घरी घेऊन जातात. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांचा हा दररोजचा दिनक्रमचं झाला आहे. आपल्या मुलाचा झालेला मृत्यू त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!