भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

लॉकडाऊन लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे याचे सूचक विधान

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. त्यामुळे राज्यात येत्या काळात लॉकडाऊन नाही, तर आणखीन कडक निर्बंध लागू शकतात, असा सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. तसेच येत्या काळात पुन्हा काही सेवांवर कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, राज्यात अशाप्रकारे रुग्णसंख्या येत्या काळात वाढली तर हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, स्पा, मॉल्सवर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील.

नक्की राजेश टोपे काय म्हणाले?
‘सध्या राज्यात दोन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. पण यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या कितपत आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही आरटीपीसीआर लॅबना एस जीन डिटेक्शनचे किड्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे दररोज आढळत असलेल्या रुग्णांमध्ये किती डेल्टा आणि किती ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत हे समजेल आणि यामुळे उपचारावर फरक पडेल. डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आपण सर्वांनी दुसऱ्या लाटेमध्ये पाहिला आहे. यामध्ये मृत्यूदर जास्त आहे, हॉस्पिटलायजेशन जास्त आहे, ऑक्सिजनची मागणी जास्त आहे. पण इतका परिणाम ओमिक्रॉनचा नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रुग्ण किती आढळतायत हे पाहण्यावर आम्ही अधिक भर देतोय,’ असे राजेश टोपे म्हणाले.

७० लाख लोकांनी अजूनही लसीचा एकही डोस घेतला नाही
पुढे टोपे म्हणाले की, ‘सध्या लसीकरणावर अधिक भर देत आहोत. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा आराखडा आखला आहे. ७० लाख लोकांनी अजूनही लसीचा पहिला डोस घेतला नाही. त्या अनुषंगाने काम करत आहोत. दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे निर्बंध आणखीन कडक केले आहेत. गर्दी कमी होण्यासाठी लग्न, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमधील उपस्थिती कमी केली आहे. आता जसे की हॉटेल असो, रेस्टॉरंट असो, चित्रपटगृह असो, स्पा असो, मॉल्स असो येत्या काळात रुग्णसंख्या वाढली तर यावर देखील कडक निर्बंध लावावे लागतील.’

शाळा बंद करण्याचा कोणताही मानस नाही
‘पॉझिटिव्हीटी रेट, बेड्स ऑक्युपेशन, ऑक्सिजनची मागणी यावर नजर ठेवून येणाऱ्या दिवसात जो काही लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, तो या तीन मुद्द्यावर अवलंबून असेल. सध्या लॉकडाऊन लावण्याबाबत कोणताही विषय नाही. पण रुग्णसंख्या वाढतेय हा चिंतेचा विषय आहे. तसेच यादरम्यान ताबडतोब लहान मुलांच्या शाळा बंद केल्या नाही पाहिजेत, असे तज्ज्ञांच्या अहवालातून सांगण्यात येत आहे, त्यामुळे शाळा बंद करण्याचा कोणताही मानस नाही,’ असे राजेश टोपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!