भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भयानक वास्तव : कर्जमाफी नंतरही राज्यातील २४८९ शेतकऱ्यांनी ११ महिन्यात केल्या आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर योजना राबवल्यानंतरही राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. २०२० या वर्षात एकूण 2 हजार 547 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. तर, गेल्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या ११ महिन्यांत २ हजार ४८९ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे भीषण वास्तव समोर आलं आहे.

कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होत नाहीत. २०२१ च्या जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद विभागात ८०४ तर नागपूर परिसरात ३०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर कोकणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली नाही.

वर्ष २०२० मध्ये एकूण २५४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; तर २०२१ मध्ये नोव्हेंबरपर्यंत २४८९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या सगळ्यात जास्त असून महाराष्ट्रातील सरासरी ५० टक्के आत्महत्या या विदर्भ क्षेत्रात होत आहेत. या वर्षी अमरावती जिल्ह्यात (३३१), यवतमाळपेक्षा (२७०) जास्त आत्महत्या झाल्या आहेत; तर औरंगाबादमध्ये ७७३ वरून ८०४ आणि नागपूरमध्ये २६९ वरून ३०९ पर्यंत आत्महत्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. कोकण विभागात मागच्या दोन वर्षांत एकाही शेतकरी आत्महत्येची नोंद नाही.

सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीपासून विविध कर्जमाफी तसेच सवलत योजनांची अंमलबजावणी केली जाते. योजनेचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे दावे यंत्रणांकडून केले जातात. ते किती फोल आहेत हे या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!