भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात तिसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा किती जणांना होऊ शकते ? मंत्र्यांनीच सांगितला भीतीदायक आकडा

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपायोजना करण्याच्या तयारीत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर होणार आहे. राज्यातील सुमारे ५ लाख बालके तिसऱ्या लाटेत संक्रमित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?
‘राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ५० लाख लोकं संक्रमित होण्याचा अंदाज आहे. तर ८ लाख सक्रीय रुग्णांची संख्या राहणार आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभावी होण्याची चर्चा आपण ऐकत आहोत. त्यामुळे अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत ५ लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता आहे. जवळपास अडीच टक्के बालके शासकीय सुविधेत दाखल होतील. साडे तीन टक्के बालकांना रुग्णालयात दाखल होण्याची व बालरोग तज्ज्ञ आहेत, त्यांचा उपचार करण्याची गरज त्याठिकाणी पडेल, अशी चिंता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे.बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना राजेंद्र शिंगणे यांनी कोरोना संकट आणि तिसऱ्या लाटेबद्दल भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली आहे,’ अशी माहिती शिंगणे यांनी दिली.

तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यविषयक सेवा सुविधा वाढवण्याचं, औषधांचा साठा करण्याचं, आरोग्य कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्याचं काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका पाहता बालरोगतज्ज्ञांची फळीदेखील सुसज्ज ठेवण्यात येत आहे, असं शिंगणे यांनी पुढे सांगितलं.

डेल्टा प्लसचा धोका वाढल्यानं पहिला, दुसरा स्तर रद्द
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. आजच्या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत. आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हे हे स्तर एकमध्ये होते. याशिवाय आठ जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते.  आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी शिथिलता मिळवायची असेल तर एक आठवड्याचा कमी होणारा पॉझिटिव्हिटी रेट बघायचे. आता तो दोन आठवड्यांचा बघितला जाईल. अधिक निर्बंध लावायचे असतील तर मात्र दोन आठवडे वाट बघण्याची गरज नसेल. जिल्हा प्रशासन गरजेनुसार निर्णय घेऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!