तिसरी लाट आलीच तर वेग लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात येणार- मुख्यमंत्र्याचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील कोरोना निर्बंध शिथिलतेसाठी ८ ते १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सोमवारी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत नियमावली समजून घेऊन मग निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यात कोरोना आटोक्यात आली असून काही जिल्ह्यात शिथिलता आपण देत आहोत. परंतू एक साधारण तिसरी लाट आलीच तर रुग्ण वाढ झाली तर वेग लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात येणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिलतेसाठी ८ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितलं आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरण करताना वेग वाढवत आहोत. दोन डोस घेतलेले नागरिक किती आहेत. तसेच दोन डोस घेऊन दिवस किती झालेत अशा नागरिकांना शिथिलता देण्यात येणार आहे. हॉटेला चलकांनी भेट घेतली होती त्यांनी नाराजी व्यक्त केली परंतू त्यांना परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. उद्या राज्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत काही नियमावली समजून घेऊन त्यानुसार मॉल्स,हॉटेल, मंदीर उघडण्याबाबत निर्णय घेत आहोत. याला ८ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
…तोपर्यंत निर्बंधांचे पालन करावे लागणार
कोविड अजूनही जात नाही पहिली, दुसरी लाट आली किती वेळी आपण उघड झाप करत राहणार, गेल्यावर्षी सणांच्या नंतर २ लाटा अनुभवल्या आहेत. या काळात आपण एक गोष्ट शिकलो आहोत की संसर्ग थोपवण्यासाठी कोविड नियम पाळावे लागणरा आहे. लसीकरणाचा वेग वाढवला असून दिवसाला ८ लाख ते १० लाख क्षमता आहे. लसीचा साठा पुरवठा वाढत असून लसीकरणाचा वेग वाढणार आहे. जोपर्यंत लसीकरण ठराविक टप्प्यात येत नाही तोपर्यंत ठराविक निर्बंध पाळावेत लागणार आहे.
राज्यामध्ये जर ३ लाट आली तर गेल्या वेळी आपण कुठे कमी पडलो याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत. कोरोना अहवाल चाचणी केंद्र आता ६००च्यावर आहेत. आयसोलेशन बेड १०० होते आता साडेचार लाख आहेत, आयसीयू बेड ३४ हजारहून अधिक आहेत, ऑक्सिजन बेड १ लाखच्या वर, तसेच व्हेंटिलेटर बेड १३ हजारहून अधिक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची गरज
विशेष म्हणजे आपल्याला कल्पना आहे की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाटलं होतं की कोविड गेला. तशीच परिस्थिती आज आहे. मग अमरावतीमध्ये कोरोना फोफावला उपाययोजना करुनही आटोक्यात आला नाही. परंतू नंतर समजले की, तो कोरोनाच्या विषाणुचा अवतार बदलला होता. डेल्टाचा प्रभाव झपाट्याने होत आहे. हे वेळेत समजण्यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब सुरु केली आहे. ही लॅब मुंबई पुरताच मर्यादीत नाही तर राज्यात जिथे जिथे शक्य होईल तेथील चाचण्या इथून करण्यात येणार आहेत.
अद्यापही कोरोनाचा संसर्गाचा धोका
राज्यात दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, फिरण्याबाबत बंधनं शिथिल केले आहेत. काही ठिकाणी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. काळजी घेण्याची ठिकाणं म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, अशा ६ जिह्यांत कोरोनाअधिक फोफावतो आहे. पूरग्रस्त भागात कोरोना वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामीण भाग आणि शहर अशा परिस्थितीमध्ये शिथिलता देण्यात येणार आहेत. शिथिलता देत असताना जिथे कोरोना आहे तिथे निर्बंध कडक करण्यात येत आहेत. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर,सांगली, सातारा, सुंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आजही काळजी घेण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाची जबाबदारी फार मोठी आहे. या कामात प्रशासकीय यंत्रणा तणावात आहे. यामुळे आपण काही गोष्टी ठरवल्या आहेत. कोविडमुक्त गाव, कोरोनामुक्त गाव यामध्ये बऱ्याच सरपंचांनी योग्य पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.