टेन्शन वाढल; राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून ऑक्सिजनची मागणी वाढत चाललीय. राज्यात सध्या दिवसाला 424 टन मेट्रीक ऑक्सिजनची मागणी आहे. डिसेंबर महिन्यात ही मागणी 270 ते 300 मेट्रिक टनच्या दरम्यान होती. त्यामुळं ऑक्सिजनची वाढती मागणी सर्वांचं टेन्शन वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय 700 मेट्रिक टनची अट ओलांडल्यास राज्यात आपोआप लॉकडाऊन लागू होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. आगामी काळात नेमंक काय घडणार हे यामुळं पाहावं लागणार आहे.