भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

डेल्टा प्लसचा वाढला धोका ; रुग्णाच्या निकट संपर्कातील 30 व्यक्तींची वैद्यकीय तपासणी
केली जाणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई(वृत्तसंस्था)। महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देखील डेल्टा प्लसची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डेल्टा प्लस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील किमान 30 व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य विभागातर्फे राज्य शासनाला देण्यात आल्या आहेत.

राज्याच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात कोरोना डेल्टा प्लस चे 76 रुग्ण आढळून आले असून या विषाणूच्या प्रसाराची क्षमता सर्वाधिक असल्यानं अधिकाधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सद्यस्थितीत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सरासरी 16 लोकांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असून प्रत्येक शहरानुसार हे प्रमाणही कमी अधिक आहे. पुण्यासह अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्यानं या जिल्ह्यातील प्रशासनानं या तपासणीकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!