भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर लोकसभ मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे समोर आले असून पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी भाजपच्या अधिकृत वेबसाईटचा स्क्रिनशॉट ट्विटवर पोस्ट केला आहे.

भाजपच्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट पत्रकार स्वाती चतुर्वेदींनी शेअर करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना ट्विटवर टॅग केलं आणि वेबसाईट कोण चालवतं?, असा सवाल स्वाती चतुर्वेदींनी केला आहे. स्वाती चुतर्वेदींच्या याच ट्विटची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन रिट्विट करत म्हटले आहे की, ‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल.’

आता या मोठ्या वादानंतर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरील खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ही तांत्रिक चूक होती? की कोणी जाणूनबुजून केलं होत? यांची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!