किरीट सोमय्याना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई, कराड येथे 9 वाजता पत्रकार परिषद
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अखेर पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर उताराविण्यात आले आहे. दरम्यान सोमय्या यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना कराड येथील सर्किट हाऊस येथे थांबविण्यात आले आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप सोमय्यानी केल्यानंतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापुरात जात असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या कराड येथून 9 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.