परिस्थितीपाहून दिवाळीनंतर सुरू करू महाविद्यालयं
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था। कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनपासून बंद असलेली शाळा महिविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे समजते आहे. दिवाळी नंतर परिस्थिती पाहून सरकार महाविद्यालय सुरु करण्याबद्दल निर्णय घेईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीत सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दिवाळीनंतर महाविद्यालयं देखील सुरु करण्याची सरकारची तयारी सुरू आहे.